मंगळवार, ४ मार्च, २०२५

आत्मबोध 1

 1. श्वसनावर लक्ष केंद्रित करणे हे मनःशांतीचे एक सशक्त साधन आहे.

2. सातत्याने निर्माण होणारे दुःख ही मुख्य समस्या मानवी जीवनात आहे.

3. ज्ञान मिळवणे हा दुःख नाहीसे करण्याचा एकमेव उपाय आहे.

4. देहाचा अभिमान हे मनुष्याच्या अज्ञानाचे मुख्य लक्षण आहे.

5. आपले अज्ञान हेच आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

6. मी देह नसून आत्मा आहे याची जाणीव होणे हेच खरे ज्ञान आहे.

7. जोडले जाणे म्हणजे योग.

8. मी कोण आहे हा एक प्रश्न प्रत्येक जीवाचे मूलतत्त्व आहे.

9. श्वसन, प्राशन,  निद्रा, ग्रहण आणि उत्सर्जन  या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत.

10. स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हा या जगात महान बनण्याचा एकमेव मार्ग आहे.
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा