सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

आत्मबोध 1

 20. भौतिक जीवनातील निरर्थकता ध्यानात येण्याला वैराग्य असे म्हणतात.

21. धर्मपालन केल्याने ज्ञान, ज्ञानाने बल, बलाने संपत्ती प्राप्त होते.

22. धर्मव्यवस्थेचे अधिकार साधनेने प्राप्त होतात.

23. नाम ही प्राण तत्वाची साधना आहे.

24. ध्यान ही अपान तत्त्वाची साधना आहे.

25. भक्ती ही व्यान तत्त्वाची साधना आहे.

26. पूजा अर्चा करणे ही उदान तत्वाची साधना आहे.

27. परिस्थिती आणि विचार पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे एकापाठोपाठ एक येतात आणि नाहीसे होतात.

28. रेषा समजली तर पूर्ण चित्र समजते.

29. साहित्य कठीण,  संगीत मध्यम तर  चित्र त्या तुलनेत सोपी कला आहे.

30. आत्म्याशी एकरूप झाल्याखेरीज कलाकृती निर्माण होत नाही.

          

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

आत्मबोध 1

 30. आत्म्याशी एकरूप झाल्याखेरीज कलाकृती निर्माण होत नाही.

31. सात्विक आनंद हे भारतीयांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

32. एक सत्कर्म अनेक सुखोपभोगांपेक्षा श्रेष्ठ आहे .

33. मोठेपण आणि अभिमान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

34. ज्याला स्वतःत बदल करता येतो, त्याच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडले जातात.

35. दुःखाचा लवलेशही नाही अशी जागा म्हणजे स्वध्यान.

36. वाक्याला भावार्थ,  शब्दार्थ आणि  विपरीत असे तीन प्रकारचे अर्थ असतात.

37. चित्र, साहित्य, संगीत, परमार्थ  विषय कोणताही असो त्यात सातत्याने खोली गाठणे आवश्यक आहे.

38.आत्मज्ञान म्हणजे स्वतःविषयी सर्व ज्ञान प्राप्त करणे हेच मनुष्याचे ध्येय आहे.

39. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट बघत बसण्यापेक्षा आलेला क्षण अधिक सुंदर बनवता येणे महत्वाचे आहे.

40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.  
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.

                   

    

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

आत्मबोध 1

 40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.  
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.

41. वस्तु आणि भौतिक साधने सुखाची निर्मिती करत नाहीत तर सुख हे मानवी मूल्यांच्या जोपासनेतूनच निर्माण होते.

42. वाचन, लेखन, श्रवण आणि दर्शन ही ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अंगे आहेत.

43. स्वध्यान हेच सर्वश्रेष्ठ ध्यान आहे.

44. तेच महत्वपूर्ण आहे, जे स्वतःजवळ आहे.

45. स्वानुभव लेखनातून स्वदर्शन घडते.

46. आपल्या गुणांचे प्रदर्शन करत राहण्यापेक्षा शिकण्यात अधिक आनंद आहे.

47. निव्वळ युक्तिवाद करून कोणाचेही मत बदलता येऊ शकत नाही.

48.एकदा का स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद मिळायला लागला की मग आनंदासाठी बाह्य घटकांची आवश्यकता राहत नाही.

49.वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा हे वाणीचे चार प्रकार आहेत.

50. मीच एकटा दुःखी आहे असे वाटणे हा निव्वळ एक आभास आहे.