१. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास का करायचा ?
मनुष्य स्वत:बद्दल व विश्वरचनेबद्दल अज्ञानी आहे. कोणत्याच गोष्टीचा स्पष्ट असा बोध होत नाही. काय चालले आहे हेच समजत नसल्याने दुःखाची मालिका संपत नाही जर प्रश्नांची उत्तरे मिळवून ज्ञान प्राप्त केले तरच दुःखनिर्मुलन होऊ शकते म्हणून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे.
२. व्यक्तिची रचना. मी कोण आहे ?..
मस्तकाच्या ठिकाणी प्राण, कंठाच्या ठिकाणी अपान हृदयाच्या ठिकाणी व्यान उदराच्या ठिकाणी उदान व जननेंद्रियांच्याठिकाणी समान नावाच्या प्राणांची किंवा प्राणशक्तींची योजना केलेली आहे प्राण हे चेतनामय असून याचमुळे मनुष्य हालचाल करू शकत आहे.
३.व्यक्तिविकास,
व्यक्ति ही पाच घटकांनी बनलेली असून या पाच घटकांचा समतोल विकास होणे आवश्यक आहे.
पृथ्वी/सम तत्वाचा शारीरिक विकास
आप/उदान तत्वाचा आर्थिक विकास
तेज/व्यान तत्वाचा भावनिक विकास
वायु / अपान तत्वाचा बौद्धिक विकास
आकाश / प्राण तत्वाचा आध्यात्मिक विकास
सर्वसाधारणपणे आजच्या काळात लोक आर्थिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत असून यामुळे व्यक्तिचा इतर तत्वांचा विकास थांबल्याने दुःखनिर्मिती होते. शारीरिक, आर्थिक, भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक यापैकी कोणत्यातरी एकाच घटकाला महत्व न देता सर्वच घटकांना घटकांना समान न्याय देणे आवश्यक ठरते
४. शारीरीक विकास - ग्रहण व उत्सर्जन उत्तमरित्या चालणे.
आर्थिक विकास- श्रम व मिळकत
भावनिक विकास- सुसंवाद, प्रेम, जवळीक - रसिकता.
बौद्धिक विकास - प्रश्नांची तर्काने उत्तरे मिळवणे, कठीण विषय समजून घेणे
आध्यात्मिक विकास - नाम, श्वासावर लक्ष ठेवणे अभिषेक, आहुती.
५. साधना -
प्राण - नाम, श्वासावर लक्ष ठेवणे
अपान- ध्यान
व्यान- भक्ती
उदान - कर्मकांड
समान - आहुती अभिषेक
.६. मूलभूत गरजा -
श्वसन, प्राशन, निद्रा, ग्रहण, उत्सर्जन या मनुष्यमात्राच्या मुख्य गरजा आहेत
७. पोषण
श्वसन, प्राशन, निद्रा, ग्रहण व उत्सर्जन याद्वारे मनुष्याचे पोषण होऊन जीव पुढचा प्रवास करत राहतो. कुपोषणाने प्रवासात अडथळे निर्माण होतात व दुःखनिर्मिती होते. कुपोषण किंवा उपोषण ही साधना नसून पोषण (योग्य मार्गाने) ही साधना आहे.
८. सृष्टी, व्युत्पत्ती व लय-
सर्व सृष्टी ही काळ्या अवकाशाने म्हणजेच शिवतत्वाने व्यापली आहे या काळ्या अवकाशाचे काही विलक्षण गुणवैशिष्ट्ये म्हणजे त्याची दिगंत आकाराची अमर्यादित सर्वव्याप्ती, परीपूर्ण बलवान, इ . काही मर्यादा म्हणजे प्रकाशाचा अभाव शब्दांचा अभाव,आकारांचा अभाव अशा आहेत म्हणजे या काळ्या अवकाशाचे सामर्थ्य तर प्रचंड आहे. मात्र ते त्याला स्पष्ट होत नसल्याने त्यातून कोहं म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न सातत्याने उच्चारला जात आहे या प्रश्नाच्या रूपाने प्रचंड ऊर्जानिर्मिती होऊन त्यातून आकाशगंगा, सूर्य, चंद्र तारे, ग्रह, इ. समस्त जीवसृष्टी जन्म पावत आहे. यातील प्रत्येक घटकाचे स्वरूप मी कोण आहे या प्रश्नाचे आहे. प्रत्येकजण आयुष्यभर अगदी प्राणी, पक्षी, चेतन, अचेतन जीवसृष्टी स्वतःच्या परीने मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा, हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. ही सृष्टी प्रकाशमान आहे भाषा वापरणारी आहे. इथे रूप आहे आकार आहे. साधने आहेत. ही सृष्टी मायारूप किंवा शक्तीरूप आहे. असे असले तरी यातील कोणताही जीव मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ ठरतो कारण जशा शिवाला मर्यादा आहेत तशा शक्तीलाही मर्यादा आहेत. म्हणजे शिव सत्य आहे तर माया किंवा शक्ती ही आभासी आहे ती या प्रश्नाचे उत्तर न देता ती या जीवाला मायेत गुंतवून ठेवण्यात समाधान मानते प्रत्येकजीव मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात थकून जातो व प्रश्नाचे उत्तर न मिळताच जीवाची सारी शक्ती नाहीशी होते. जीवाची शक्ती संपल्याने समाधान लाभते व तो जीव शक्ती संपल्याने शिवात विलीन होतो. ही प्रक्रिया विश्वात किंवा सृष्टीत अखंडपणे चालू राहते

No comments:
Post a Comment