1. श्वसनावर लक्ष केंद्रित करणे हे मनःशांतीचे एक सशक्त साधन आहे.
2. सातत्याने निर्माण होणारे दुःख ही मुख्य समस्या मानवी जीवनात आहे.
3. ज्ञान मिळवणे हा दुःख नाहीसे करण्याचा एकमेव उपाय आहे.
4. देहाचा अभिमान हे मनुष्याच्या अज्ञानाचे मुख्य लक्षण आहे.
5. आपले अज्ञान हेच आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
6. मी देह नसून आत्मा आहे याची जाणीव होणे हेच खरे ज्ञान आहे.
7. जोडले जाणे म्हणजे योग.
8. मी कोण आहे हा एक प्रश्न प्रत्येक जीवाचे मूलतत्त्व आहे.
9. श्वसन, प्राशन, निद्रा, ग्रहण आणि उत्सर्जन या मनुष्याच्या मुख्य गरजा आहेत.
10. स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हा या जगात महान बनण्याचा एकमेव मार्ग आहे.
आत्मबोध
रेखांकने, संवाद, आत्मबोध
मंगळवार, ४ मार्च, २०२५
आत्मबोध 1
शनिवार, १ मार्च, २०२५
आत्मबोध 1
11. गुरु शिष्याला त्याच्या स्वस्वरुपाची जाणीव करून देतात.
12. विश्व स्वयंचलित आहे.
13. चुकीचे रस्ते फार दूर जात नाहीत.
14. जगात सर्वत्र द्वैत आढळते.
15. या जगात सर्व प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होत राहते, नव्याने काहीच घडत नाही.
16. लोक चमत्काराच्या मागे धावतात.
17. साधक स्वतःच्या क्षमता वाढविण्यात व्यस्त असतात.
18. शिकण्याची संधी नेहमीच उपलब्ध असते.
19. सर्व गरजा पूर्ण करता येऊ शकतात मात्र सर्व इच्छा पूर्ण करता येऊ शकत नाहीत.
20. भौतिक जीवनातील निरर्थकता ध्यानात येण्याला वैराग्य असे म्हणतात.
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
आत्मबोध 1
20. भौतिक जीवनातील निरर्थकता ध्यानात येण्याला वैराग्य असे म्हणतात.
21. धर्मपालन केल्याने ज्ञान, ज्ञानाने बल, बलाने संपत्ती प्राप्त होते.
22. धर्मव्यवस्थेचे अधिकार साधनेने प्राप्त होतात.
23. नाम ही प्राण तत्वाची साधना आहे.
24. ध्यान ही अपान तत्त्वाची साधना आहे.
25. भक्ती ही व्यान तत्त्वाची साधना आहे.
26. पूजा अर्चा करणे ही उदान तत्वाची साधना आहे.
27. परिस्थिती आणि विचार पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे एकापाठोपाठ एक येतात आणि नाहीसे होतात.
28. रेषा समजली तर पूर्ण चित्र समजते.
29. साहित्य कठीण, संगीत मध्यम तर चित्र त्या तुलनेत सोपी कला आहे.
30. आत्म्याशी एकरूप झाल्याखेरीज कलाकृती निर्माण होत नाही.
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५
आत्मबोध 1
30. आत्म्याशी एकरूप झाल्याखेरीज कलाकृती निर्माण होत नाही.
31. सात्विक आनंद हे भारतीयांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
32. एक सत्कर्म अनेक सुखोपभोगांपेक्षा श्रेष्ठ आहे .
33. मोठेपण आणि अभिमान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
34. ज्याला स्वतःत बदल करता येतो, त्याच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडले जातात.
35. दुःखाचा लवलेशही नाही अशी जागा म्हणजे स्वध्यान.
36. वाक्याला भावार्थ, शब्दार्थ आणि विपरीत असे तीन प्रकारचे अर्थ असतात.
37. चित्र, साहित्य, संगीत, परमार्थ विषय कोणताही असो त्यात सातत्याने खोली गाठणे आवश्यक आहे.
38.आत्मज्ञान म्हणजे स्वतःविषयी सर्व ज्ञान प्राप्त करणे हेच मनुष्याचे ध्येय आहे.
39. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट बघत बसण्यापेक्षा आलेला क्षण अधिक सुंदर बनवता येणे महत्वाचे आहे.
40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
आत्मबोध 1
40. दुःख/पाप याबद्दल भीती वाटणे, जिज्ञासा, मुमुक्षत्व, साधक, सिध्द, संत, गुरु हे परमार्थ मार्गातील टप्पे आहेत.
आपण कोणत्या टप्प्यावर आहोत याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.
41. वस्तु आणि भौतिक साधने सुखाची निर्मिती करत नाहीत तर सुख हे मानवी मूल्यांच्या जोपासनेतूनच निर्माण होते.
42. वाचन, लेखन, श्रवण आणि दर्शन ही ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अंगे आहेत.
43. स्वध्यान हेच सर्वश्रेष्ठ ध्यान आहे.
44. तेच महत्वपूर्ण आहे, जे स्वतःजवळ आहे.
45. स्वानुभव लेखनातून स्वदर्शन घडते.
46. आपल्या गुणांचे प्रदर्शन करत राहण्यापेक्षा शिकण्यात अधिक आनंद आहे.
47. निव्वळ युक्तिवाद करून कोणाचेही मत बदलता येऊ शकत नाही.
48.एकदा का स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद मिळायला लागला की मग आनंदासाठी बाह्य घटकांची आवश्यकता राहत नाही.
49.वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा हे वाणीचे चार प्रकार आहेत.
50. मीच एकटा दुःखी आहे असे वाटणे हा निव्वळ एक आभास आहे.
रविवार, १९ जानेवारी, २०२५
आत्मबोध सिध्दांत
१. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास का करायचा ?
मनुष्य स्वत:बद्दल व विश्वरचनेबद्दल अज्ञानी आहे. कोणत्याच गोष्टीचा स्पष्ट असा बोध होत नाही. काय चालले आहे हेच समजत नसल्याने दुःखाची मालिका संपत नाही जर प्रश्नांची उत्तरे मिळवून ज्ञान प्राप्त केले तरच दुःखनिर्मुलन होऊ शकते म्हणून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे.
२. व्यक्तिची रचना. मी कोण आहे ?..
मस्तकाच्या ठिकाणी प्राण, कंठाच्या ठिकाणी अपान हृदयाच्या ठिकाणी व्यान उदराच्या ठिकाणी उदान व जननेंद्रियांच्याठिकाणी समान नावाच्या प्राणांची किंवा प्राणशक्तींची योजना केलेली आहे प्राण हे चेतनामय असून याचमुळे मनुष्य हालचाल करू शकत आहे.
सृष्टीची रचना . व्यक्तिप्रमाणेच सृष्टीची रचना आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच तत्वांनी सृष्टी बनलेली आहे. व्यक्तितील पाच घटकांशी सृष्टीतील पाच घटकांशी साम्य आहे.
३.व्यक्तिविकास,
व्यक्ति ही पाच घटकांनी बनलेली असून या पाच घटकांचा समतोल विकास होणे आवश्यक आहे.
पृथ्वी/सम तत्वाचा शारीरिक विकास
आप/उदान तत्वाचा आर्थिक विकास
तेज/व्यान तत्वाचा भावनिक विकास
वायु / अपान तत्वाचा बौद्धिक विकास
आकाश / प्राण तत्वाचा आध्यात्मिक विकास
४. शारीरीक विकास - ग्रहण व उत्सर्जन उत्तमरित्या चालणे.
आर्थिक विकास- श्रम व मिळकत
भावनिक विकास- सुसंवाद, प्रेम, जवळीक - रसिकता.
बौद्धिक विकास - प्रश्नांची तर्काने उत्तरे मिळवणे, कठीण विषय समजून घेणे
आध्यात्मिक विकास - नाम, श्वासावर लक्ष ठेवणे अभिषेक, आहुती.
प्राण - नामजप करणे, श्वासावर लक्ष ठेवणे
अपान- ध्यान करणे.
व्यान- इष्टदेवतेची भक्ती करणे.
उदान - कर्मकांड, पूजा
समान - आहुती, अभिषेक
.६. मूलभूत गरजा -
श्वसन, प्राशन, निद्रा, ग्रहण, उत्सर्जन या मनुष्यमात्राच्या मुख्य गरजा आहेत
७. पोषण
श्वसन, प्राशन, निद्रा, ग्रहण व उत्सर्जन याद्वारे मनुष्याचे पोषण होऊन जीव पुढचा प्रवास करत राहतो. कुपोषणाने प्रवासात अडथळे निर्माण होतात व दुःखनिर्मिती होते. कुपोषण किंवा उपोषण ही साधना नसून पोषण (योग्य मार्गाने) ही साधना आहे.
८. सृष्टी, व्युत्पत्ती व लय-
सर्व सृष्टी ही काळ्या अवकाशाने म्हणजेच शिवतत्वाने व्यापली आहे या काळ्या अवकाशाचे काही विलक्षण गुणवैशिष्ट्ये म्हणजे त्याची दिगंत आकाराची अमर्यादित सर्वव्याप्ती, परीपूर्ण, बलवान, इ . काही मर्यादा म्हणजे प्रकाशाचा अभाव शब्दांचा अभाव,आकारांचा अभाव अशा आहेत म्हणजे या काळ्या अवकाशाचे सामर्थ्य तर प्रचंड आहे. मात्र ते त्याला स्पष्ट होत नसल्याने त्यातून कोहं म्हणजे मी कोण आहे? असा प्रश्न सातत्याने उच्चारला जात आहे या प्रश्नाच्या रूपाने प्रचंड ऊर्जानिर्मिती होऊन त्यातून आकाशगंगा, सूर्य, चंद्र तारे, ग्रह, इ. समस्त जीवसृष्टी जन्म पावत आहे. यातील प्रत्येक घटकाचे स्वरूप मी कोण आहे या प्रश्नाचे आहे. प्रत्येकजण आयुष्यभर अगदी प्राणी, पक्षी, चेतन, अचेतन जीवसृष्टी स्वतःच्या परीने मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा, हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. ही सृष्टी प्रकाशमान आहे भाषा वापरणारी आहे. इथे रूप आहे आकार आहे. साधने आहेत. ही सृष्टी मायारूप किंवा शक्तीरूप आहे. असे असले तरी यातील कोणताही जीव मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ ठरतो कारण जशा शिवाला मर्यादा आहेत तशा शक्तीलाही मर्यादा आहेत. म्हणजे शिव सत्य आहे तर माया किंवा शक्ती ही आभासी आहे ती या प्रश्नाचे उत्तर न देता ती या जीवाला मायेत गुंतवून ठेवण्यात समाधान मानते प्रत्येकजीव मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात थकून जातो व प्रश्नाचे उत्तर न मिळताच जीवाची सारी शक्ती नाहीशी होते. जीवाची शक्ती संपल्याने समाधान लाभते व तो जीव शक्ती संपल्याने शिवात विलीन होतो. ही प्रक्रिया विश्वात किंवा सृष्टीत अखंडपणे चालू राहते